जळगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आलीPudhari News Network
जळगाव
जळगावात तिरंगा यात्रा; पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तिरंगा यात्रेस सुरुवात
जळगाव : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी जळगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.
तिरंगा यात्रेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. नागरिकांनी सुमारे 70 फूट लांबीचा तिरंगा ध्वज हातात घेत नेहरू चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढली. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर राष्ट्रगीताने यात्रेची सांगता करण्यात आली.
यावेळी नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, राधेश्याम चौधरी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

