जळगाव : शनिपेठमधील संशयित आरोपीला न्यायालयात आणताना तणाव पूर्ण वातावरण

Jalgaon Crime News | संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी
Jalgaon Crime News
शनिपेठमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात आणले असतात न्यायालयात वातावरण तणावाचे झाले होते.Pudhari Photo
Published on
Updated on

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : शनिपेठमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात आणले असतात न्यायालयात वातावरण तणावाचे झाले होते. दुसऱ्या समाजाचे युवक न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने पोलिसांना मोठी कुमक न्यायालयाच्या आवारात मागवावी लागली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. तर पोलिसांनी आवारात जमवलेले जमावला योग्य तो समज देऊन त्या ठिकाणाहून पांगवले. त्यानंतर वातावरण निवडले.

शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला आज ( दि. १७) दुपारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते., मात्र आरोपीला न्यायालयात आणतात एका विशिष्ट समाजाच्या मुलांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी डीवायएसपी संदीप गावित, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी व शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वातावरण निवडले गेले. आरोपीला मागच्या दरवाजाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सुरक्षित बाहेर काढण्यात आले. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

याबाबत डीवायएसपी संदीप गावित यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की 11 मार्च रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी प्रवीण रमेश कोळी त्याला न्यायालयात आणले असता काही ग्रुपवर अशी अफवा पसरली की, त्याला तत्काळ बेल मिळणार आहे. या अनुषंगाने काही मुलांनी गर्दी केली होती. आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. जमावाला शांत करून न्यायालयाच्या परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे.

नागरिकांनी आपण वर विश्वास ठेवणे तो कोणीही अशा पसरू नये, असे आव्हान डीवायएसपी संदीप गावित यांनी केले.

घटना काय

शहरातील वाल्मिक नगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळत असताना काही संशयित त्याठिकाणी आले. त्यांनी त्या मुलाचे अपहरण केल्याचा संशय परिसरातील नागरिकांना आला. या घटनेची माहिती मिळताच त्या परिसरात राहणारा प्रवीण रमेश कोळी त्याठिकाणी आला. त्यानंतर तलवार घेऊन त्यांच्या मागे धावत सुटला. ते सर्वजण एका धार्मीक स्थळाच्या दिशेने गेल्याचे समजल्यानंतर प्रवीण कोळी हा तलवार घेऊन त्याठिकाणी गेला. त्याने धार्मीक स्थळाच्या आवारात ठेवलेले माठ आणि प्लास्टिकची पाण्याची टाकी तलवारीने फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी कोळी याला ताब्यात घेतले.

अपहरण करणाऱ्यासह दहशत माजविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तलवार घेऊन तोडफोड करीत दहशत माजविल्याप्रकरणी प्रवीण रमेश कोळी (वय ३०, रा. पिंजारीवाडा, वाल्मिक नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Jalgaon Crime News
जळगाव : ठेवी परत मिळवण्यासाठी वृद्ध ठेवीदार रस्त्यावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news