

जळगाव : सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत एकूण १९ पदके पटकावली. यात १० सुवर्ण, ४ रौप्य व ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्पर्धेचे यजमान असलेल्या जळगावच्या अनुभूती स्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी पदके जिंकून महाराष्ट्राच्या वर्चस्वात मानाचा तुरा खोवला आहे.
विजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास आणि आंतरराष्ट्रीय पंच ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.
१६ सप्टेंबरपासून अनुभूती स्कूल येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत देशभरातून ३०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. १९, १७ आणि १४ वर्षांखालील गटात सामने खेळवले गेले.
१४ वर्षाखालील गटातील सर्वोत्तम खेळाडू : दिशा मेहता (महाराष्ट्र)
१७ वर्षाखालील गटातील सर्वोत्तम खेळाडू : पूर्विका एम (कर्नाटक-गोवा)
१९ वर्षाखालील गटातील सर्वोत्तम खेळाडू : दिवा गुप्ता (उत्तर प्रदेश)
अनुभूती स्कूलच्या अलेफिया शाकीर (कांस्य, ६८ कि.गट), समृद्धी कुकरेजा (कांस्य, ४९ कि.गट) आणि पलक सुराणा (रौप्य) यांनी पदके मिळवत महाराष्ट्राच्या झोळीत पदकांची लयलूट केली.
सुवर्णपदक विजेते : मंजिरी तळगावकर, विरती बेदमुथा, स्वस्तिका यांच्यासह इतर खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले.
रौप्य व कांस्य विजेते : सर्वज्ञा, निया दोषी, अनुष्का मुद्री, देवांगी चक्रबर्ती यांच्यासह अनेकांनी पदके जिंकली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे आणि प्रशिक्षक अजित घारगे, जयेश बाविस्कर, महेश घारगे, रवींद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, समीर शेख, मोहम्मद फजल, सुयश बुरकूल, किशोर सिंग, वाल्मिक पाटील, सोनाली हटकर, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, राहुल निभोंरे, सैय्यद मोहसीन, अब्दुल मोसीन जब्बार, योगेश धोंगडे, दिपिका ठाकूर यांनी मोलाचे परिश्रम घेतले.