२० खुनांचे गुन्हे : 'कॉन्ट्रॅक्ट किलर' जळगाव 'LCB'च्या जाळ्यात

१६ लाखाची सुपारी घेऊन दोघांचा खून; दोघांवर २० गुन्हे दाखल
20 Murder's Contract Killer Arrested By Jalgoan LCB
सुरतमधील दुहेरी हत्याकांडातील संशयितांना जळगाव पोलिसांनी अटक केलीPudhari Photo
Published on
Updated on

जळगाव : गुजरातमधील सुरतमध्ये सुपारी घेऊन दोघांचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील संशयित आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार अजिंठा चौफुली येथून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अफजल अब्दुल शेख (वय ३८) व प्रशनेश दिलीप गामीत (वय २६, रा.तरकूबा डूंगरी फलीया ता.व्यारा जि. तापी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सुरतमध्ये बिलाल चांदी, अज्जु या दोघांचा खून करण्यात आला होता. 'एमआयएम'च्या नेत्याच्या सांगण्यावरून १६ लाखात सुपारी घेऊन हे खून केल्याची कबूली संशयित आरोपींनी दिली.

20 Murder's Contract Killer Arrested By Jalgoan LCB
देवळी येथे दारूसाठी पैसे न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून

याबाबत अधिक माहिती अशी, गुजरातमधील सुरतमध्ये दोघांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी अमरपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अफजल अब्दुल शेख व त्याचा साथीदार प्रज्ञनेश दिलीप गामीत हे खूनानंतर गुजरात राज्यातून फरारी होते. हे दोघे संशयित जळगाव येथील अजिंठा चौफुली येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सुरतचे 'एमआयएम' चे खुर्शीद अली सैय्यद यांनी १६ लाख रुपयाची सुपारी दिल्यानंतर बिलाल चांदी, अज्जु या दोघांचा खून केल्याची कबुली दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news