Silver Price rise | चांदीची बुलेट ट्रेन सुसाट

एका दिवसातच 22 हजारांची उसळी!
Silver Price rise
Silver Price rise | चांदीची बुलेट ट्रेन सुसाट
Published on
Updated on

जळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगाव सराफा बाजारात शुक्रवारी दरवाढीचा जणू स्फोटच झाला. अवघ्या एका दिवसात चांदीने तब्बल 22 हजार रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली असून, सोन्यानेही तोर्‍यात 4,300 रुपयांची आघाडी घेतली. गुरुवारी (दि. 22) शांत असलेला बाजार शुक्रवारी (दि. 23) सकाळी उघडताच दरांचे आकडे पाहून ग्राहकांसह व्यापार्‍यांचेही डोळे विस्फारले आहेत.

जळगाव सराफा बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 51 हजार 500 रुपये होता, जो शुक्रवारी थेट 1 लाख 55 हजार 800 रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीने तर सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. 3 लाख 8 हजार रुपयांवर असलेली चांदी एका दिवसात 3 लाख 30 हजारांवर पोहोचली. ऐन लग्नसराईच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

22 कॅरेटचे दरही दीड लाखाकडे

सोन्या-चांदीच्या या अवाढव्य दरवाढीमुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 22 कॅरेट दागिन्यांच्या सोन्याचा दरही आता दीड लाखाच्या उंबरठ्यावर (1,42,700 रुपये) पोहोचल्याने, लग्नासाठी दागिने खरेदी करणे कठीण बनले आहे. चांदीने 3 लाखांचा टप्पा ओलांडून 3 लाख 30 हजारांवर मजल मारल्याने, औद्योगिक मागणी आणि गुंतवणुकीचा ओघ यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरांची उसळी (एका दिवसातील वाढ)

24 कॅरेट सोने (तोळा)

1,51,500

(22 जानेवारी 2026 )

1,55,800

(23 जानेवारी 2026)

4,300

22 कॅरेट सोने (तोळा)

1,38,774

(22 जानेवारी 2026 )

1,42,700

(23 जानेवारी 2026)

3,926

चांदी (किलो)

3,08,000

(22 जानेवारी 2026 )

3,30,000

(23 जानेवारी 2026)

22,000

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news