

जळगाव : शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून अलीकडेच एका चार वर्षांच्या बालकाचा बळी गेल्याच्या घटनेने या विषयाला गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) गटाने महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. मनपा आयुक्तांना घेराव घालून भटक्या श्वानांच्या प्रश्नी जाब विचारण्यात आला. आठ दिवसांत भटक्या श्वानांचा बंदोबस्त न झाल्यास सर्व मोकाट श्वान आयुक्तांच्या दालनात सोडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि महानगरप्रमुख शरद तायडे यांनी केले. त्यांनी आयुक्तांना निवेदन देत कठोर शब्दांत भूमिका मांडली. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकीर पठाण, उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, बाळा कंखरे, महिला आघाडी महानगरप्रमुख गायत्री सोनवणे, मनिषा पाटील, उपमहानगरप्रमुख नीता सांगोळे, जया तिवारी, कुसुंबा उपसरपंच प्रमोद घुगे, विभागप्रमुख किरण भावसार, शोएब खाटीक, कलीम खान, शकील रंगरेज, शरद पाटील, विजय राठोड, लखन सांगिले, भैय्या वाघ, सौरभ चौधरी, आबीद खान, गोरख केदार, बापू मेणे, सतीश मोरे, राहुल पाटील, राहुल शिंदे, नितीन राजपूत, रोहन पराये आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार, जर आठ दिवसांच्या आत मोकाट श्वानांवर कारवाई झाली नाही, तर शहरभरातील भटक्या श्वानांना एकत्र करून थेट आयुक्तांच्या दालनात सोडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.