

जळगाव : सर्वप्रथम संजय राऊत यांना ऍडमिट केले पाहिजे त्यांनी पहिले शिवसेना संपवली आता राष्ट्रवादी संपवित आहेत. मुख्यमंत्री पदावरून कुठली अडचण नाही. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा विषय संपवून टाकलेला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
संजय राऊत पागल झाला आहे. मेंटल झाल्यामुळे त्याच्या हातात आता दगड द्या. त्याने हातात दगड घ्यावे आणि भिवंडीच्या बाजारात फिरावे, असा सल्ला गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांना दिला. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःहून सांगितले की, मुख्यमंत्री पदावरून माझा कुठलाही अडचणीचा विषय नाही. येत्या काळात एकनाथ शिंदेंना संपूर्ण अधिकार हे शिवसेना पक्षाने दिलेले आहेत.त्यामुळे आता पुढे जे काही निर्णय घेतले जातील ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच घेतले जातील. असे पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सर्व समावेशक आणि जनतेला उपयोगी पडतील अशी कामे केली आहेत. त्यामुळे स्वाभाविकच जनतेला वाटत आहे की, त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे. मात्र त्यांनी स्वतःच या मुद्द्याला खोडून काढत, माझा या गोष्टीत कुठलाही अडथळा नाही. असे सांगितले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं त्यांनी स्वतः सांगितल आहे. असेही गुलाबराव पाटील म्हणाले.