

जळगाव : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, महानगरपालिका, भाजप कार्यालय व विमानतळावर उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रांत कार्यालयात विजय गावित यांच्या हस्ते तर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त ढेरे यांच्या हस्ते मानाले ध्वजारोहण करण्यात आले. विमानतळावर संचालक हर्ष त्रिपाठी यांनी राष्ट्रध्वजाला मानाचा सलाम केला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजू मामा) भाजपच्या शहर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे व भाजपाचे आजी-माजी महानगरपालिका नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हाध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय विमानतळ प्राधिकरण जळगावतर्फे आयोजित प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक नृत्य सादर करत आणि भारतीय सांस्कृतीचे शानदार सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. सोहळ्याला विमानतळाचे माननीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील स्टेकहोल्डर्स देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते.