Raksha Khadse|रक्षा खडसेंनी घेतली खासदारकीची शपथ

रावेरमधून साधली 'हॅट्रिक'
MP Raksha Khadse
रक्षा खडसेंनी घेतली खासदारकीची शपथFile Photo

जळगाव : देशात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले असून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आज (दि. २४) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत खासदारांना खासदाकीची शपथ दिली जात आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनीही आज खासदारकीची शपथ घेतली.

Summary
  • रक्षा खडसे भाजप पक्षाच्या तिकीटावर रावेरमधून तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत.

  • सध्या त्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री आहे.

  • त्यांनी आता खासदारकीची शपथ घेतली.

भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांनी रक्षा खडसेंना खासदारकीची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते. रक्षा खडसेंनी यंदा खासदारकीच्या हॅट्रिकसह केंद्रात राज्यमंत्रीपदही मिळवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news