Jalgaon : आमच्या आवडीवर नसते, पक्षाने दिले ते काम करावे लागते : मंत्री रक्षा खडसे

Raksha Khadse : दीशाच्या बैठकीनंतर माध्यमांशी साधला संवाद
Raksha Khadse
मंत्री रक्षा खडसे file photo
Published on
Updated on

जळगाव : पक्ष जी जबाबदारी दिली ती पार पाडावी लागते पक्षाने दिलेले काम आम्हाला करावे लागते असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रक्षक खडसे यांनी दीशाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केले. तर नामदार सावकार यांनी पालकमंत्र्याच्या पदावरून बगल देत पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले.

दिशाच्या बैठकीच्या आयोजनानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, पक्षाने जबाबदारी दिलेली असते ती पार पाडावी लागते. पालकमंत्र्यांचे विषय हा राज्याचा विषय आहे. सावकारे यांना पालकमंत्री बनण्यास आवडेल का असे विचारले असता त्यावर या प्रश्नाला खो देत त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखविले. याबाबत सर्वस्वी पक्ष ठरवेल असे त्यांनी सांगितले. मी मंत्रीपदाच्या रेस मध्ये सुद्धा नव्हते. मला पक्ष जबाबदारी देईल ती मी पार पाडणार आहे. पक्ष ठरवेल तेच आम्ही करीत असतो, असे खडसे म्हणाल्या.

काही दिवसात मध्ये राष्ट्रवादीचे व उबाठाचे नेते , कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत यावर बोलताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, आमचे नेते गिरीश महाजन या जिल्ह्याचे नेते आहेत. कोणाला पक्षात घ्यायचं नाही, घ्यायचं आहे हे ते ठरवतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news