जळगाव : लपाछपीचा खेळ खेळण्याठी अकरा वर्षीय लहान मुलगी घरामध्ये लपण्यासाठी आली, हे पाहून एका प्रौढ व्यक्तीने (वय 40) त्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तसेच दुसरी घटना जामनेर तालुक्यातील डोहारी येथील शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने देखील अत्याचार केल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला आहे. या दोन्ही घटनांबाबत जळगाव व जामनेर येथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे तर जामनेर येथील आरोपीला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे. (Two teenage girls became victims of lust in Jalgaon and Jamner: Both the accused arrested in both cases)
जळगाव व जामनेरमध्ये दोन किशोरवयीन मुली वासनेच्या बळी ठरल्या आहेत. दोघींचा विनयभंग झाला असून दाेन घटनांमधील दाेन्ही आराेपींना जळगाव पोलीसांनी अटक केली आहे. लपाछपी खेळताना खाेलीत लपण्यासाठी आलेल्या शेजारील अकरा वर्षीय मुलीवर एका प्राैढाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १२ ऑगस्ट राेजी शहरातीलच महामार्गालगतच्या एका भागात घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील रामानंद पोलीस स्टेशन हद्दीत संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे (४०) यांच्या घराजवळ मुले लपंडावचा खेळ खेळत होती. यामध्ये एक अकरा वर्षाची अल्पवयीन मुलगी सुद्धा खेळत होती. मुलगी आरोपीच्या घरात लपाछपी खेळतांना लपायला गेली असता, सिद्धार्थ वानखेडे हा देखील मुलीपाठोपत्घतठ घरात शिरला व त्याने घराच्या दरवाजा बंद करून सर्व लाईट बंद करून मुलीवर अत्याचार केला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी दुपारी चार ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.
मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपीने मुलीचे तोंड दाबून जीव ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसानंतर मुलीच्या आई वडिलांना या घटनेबाबत कळल्यानंतर त्यांनी तत्काळ धाव घेत बुधवारी (दि.28) रोजी रामानंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे हा मुंबईला पळून गेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथकाने गुरुवारी (दि.29) रोजी मुंबईवरून अटक केले आहे. आज शुक्रवार (दि.30) रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
तसेच जामनेर तालुक्यातील डोहरी येथील अल्पवयीन मुलीचा शेजारी असलेल्या अल्पवयीन मुलाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना चार दिवसापूर्वी उघड झाली आहे. याबाबत बुधवारी (दि.28) रोजी जामनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयित आरोपीला गुरुवारी (दि.29) रोजी न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार आरोपीला बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहेत.