रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग

file photo
file photo

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : सध्या रस्त्यावरील अपघातात मोठ्या प्रमाणात होत आहे. यात सर्वात गंभीर विषय मोटरसायकल अपघातांचा आहे. ओवर स्पीडमुळे मृत्यूच्या प्रमाणाची संख्या वाढलेली आहे. या मृत्यूच्या संख्येमध्ये राज्यात पुणे नाशिक नगर सोलापूर व जळगाव हे एक ते पाच क्रमवारीत येतात यांना प्राधान्याने यांच्याकडे लक्ष देण्यात येत असल्याची माहिती ए डी जी रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली.

जळगाव शहरातील पारधी नगर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस स्थानकाचे उद्घाटन रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. यावेळी एसपी ठाणे मोहन दहिकर डीवायएसपी मोराळे हे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद संस्थांना जिल्हा पोलीस कार्यालयात त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्वाधिक अपघातांच्या मृत्यू होणाऱ्यांमध्ये जिल्ह्यात पुणे एक नंबर नाशिक दोन नंबर नगर तीन नंबर तर चार नंबरला सोलापूर व पाच नंबरला जळगाव यांचा क्रमांक लागतो याकडे प्राधान्याने लक्ष देत असून यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होतात त्यात पुणे 923 नाशिक 912 नगर 841 सोलापूर 864 जळगाव 552 अपघातांमध्ये मृत्यू झालेले आहेत.

राज्यात होणाऱ्या अपघातांमध्ये दोन-तीन प्रकार गंभीर आहेत. त्यात मोटरसायकल अपघात सर्वाधिक जास्त आहेत. मागील वर्षी 1524 अपघात झाले होते. त्यामध्ये 7700 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. 2021 पासून मृत्युंजय दूत योजना सुरू केली आहे. यामध्ये राज्यात 3600 मृत्युंजय दूत झालेले आहेत. भारतात रस्ते अपघातात 2021 मध्ये एक लाख 53 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news