Nashik News | जळगाव झेडपीच्या मुख्याधिकाऱ्यांचे व्हाट्सअप हॅक

कोणताही प्रतिसाद न देण्याचे आवाहन
jalgaon
जळगाव झेडपीच्या मुख्याधिकाऱ्यांचे व्हाट्सअप हॅकfile photo
Published on
Updated on

जळगांव पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री. अंकित यांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअप हॅक केले असून या बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना संशयास्पद मेसेज पाठवण्यात येत आहे. अशा स्वरुपाचे मेसेज आल्यास त्याची दखल घेऊ नये व त्याची तक्रार दाखल करावी असे आवाहन मुख्याधिकारी अंकित यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री अंकित यांचे नाव व छायाचित्र वापरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बनावट प्रोफाइल तयार केले आहे. या बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून व मोबाईल क्रमांक 94 78 25 600 60 यावरून जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांना संशयास्पद मेसेज मिळालेले आहेत. संबंधित अज्ञात व्यक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी अंकित असल्याचे भासवित आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही व ही फसवणूक लक्षात घेता या मेसेजला कोणीही बळी पडू नये असा प्रकार आपल्या निदर्शनास येताच त्या अज्ञात मोबाईल धारकास कोणताही प्रतिसाद न देता तक्रार करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news