Jalgaon Crime News | धक्कादायक: जळगावच्या अल्पवयीन मुलीवर सुरतमध्ये अत्याचार

मुलीला फुस लावून पळवणारा राहुल राठोड अद्याप फरार; रमानंदनगर पोलीस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

जळगाव : शहरातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका २ वर्षे मोठ्या नराधमाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडितेला गुजरातच्या सुरत शहरात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केले आणि कोणाला सांगितल्यास जिवंत न सोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी रमानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी राहुल राठोड अद्याप फरार आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील चैताली टेंट हाऊसजवळ राहणारा राहुल रमेश राठोड (वय २५) याने २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रथ चौक परिसरातून पीडितेची दिशाभूल करून तिला फूस लावून आपल्यासोबत पळवून नेले. आरोपीने पीडितेला थेट गुजरात राज्यातील सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले.

सुरतेत पीडितेचा घात

३० जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास, सुरत येथील बहिणीच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत राहुलने पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. नराधमाचा पाशवी अत्याचार सहन केल्यानंतर पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, 'जर तू याबद्दल कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी जीवघेणी धमकी राहुलने तिला दिली.

पोलीस कारवाई व गुन्हा नोंद

पीडितेने जळगावात परतल्यानंतर आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला. पीडित १७ वर्ष ३ महिने वयाची (अल्पवयीन) असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रमानंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राहुल राठोड विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२), ६४, ३५१(२) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भूषण कोते करत आहेत. दरम्यान, घटनेनंतर आरोपी राहुल राठोड फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news