

जळगाव : भुसावळ-औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर जुने भेल्याड, म्हणजेच सध्याच्या रॉ वॉटर बनवण्याच्या ठिकाणी कंपाउंडच्या बाहेर असलेल्या काटेरी झाडाझुडपांना आग लागली.
भुसावळ शहरानजीक रॉ वॉटर प्लांट जवळ विश्वराज कंपनीच्या जागेवर भीषण आग लागली. अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. या आगीत झाडे जळून गेली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जवळच दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र आणि कोट्यावधी रुपयाचे पाईप व इतर साहित्य थोडक्यात वाचले आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ प्रतिसाद दिल्याने लाखो रुपयांचे पाईप व इतर साहित्य वाचवण्यास मदत मिळाली आहे. या परिसरात कोट्यावधी रुपयांचा माल असूनही कोणत्याही प्रकारची सुरक्षेचे उपाय नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या भीषण आगीत विश्वराज कंपनीच्या जागेवर समान ठेवण्यात आलेला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. घटनास्थळी सिक्युरिटी गार्ड व कामगार उपस्थित असूनही सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. आग लागल्यानंतर फायर ब्रिगेड प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद दिला व दिपनगर वाचवले. लाखो रुपयांच्या पाईप व बिटुमिन कोटिंगचे संभाव्य नुकसान टाळण्यात यश आले आहे. या घटनेने सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.