हॉटेलला भीषण आग, पोलिसांचे प्रसंगावधान, ६ ते ७ जणांचे वाचवले प्राण

पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागली आग
Jalgaon Massive Fire
हॉटेलला भीषण आग, पोलिसांचे प्रसंगावधान, ६ ते ७ जणांचे वाचवले प्राणFile Photo
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे 22 रोजी पहाटे 03.00 वाजता शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागण्याची घटना घडली. आगीच्या दरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचून ६ ते ७ जणांना सुरक्षितपणे आगीमधून बाहेर काढले.

या दरम्यान, PSI गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देऊन घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुरेश पोपट महाजन (वय 46 वर्ष) हा देखील पाठीला आणि पायाला भाजल्यामुळे व मयूर लक्ष्मण कुमावत (वय 32 वर्ष) हा उजव्या हाताने पायात भाजल्यामुळे जखमी झाले असून त्यांना देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. फायर ब्रिगेडच्या मदतीने आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली असून, अधिकृत तपास सुरु आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे. या घटनेत पोलिसांनी प्रसंगावधान दाखविले. यावेळी पीएसआय गणेश सायकर पोलीस हवालदार अजय पाटील, नितीन वाल्हे, संदीप पाटील, पोलीस शिपाई दीपक चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, समाधान पाटील, विलास पवार, प्रवीण पवार, राहुल नारेकर फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात अन्यास मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news