Jalgaon murder news | छातीवर गोंदलेलं प्रेम अन् डोक्यात घातलेली गोळी! अकुलखेड्यात 'सोशल' मैत्रीचा रक्ताळलेला अंत

Social media friendship love murder | विवाहित प्रियसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या; माय-लेकीच्या डोळ्यांदेखत संसाराची राखरांगोळी
Jalgaon murder news
Jalgaon murder news
Published on
Updated on

जळगाव : सोशल मीडियावरील 'लाईक' आणि 'कमेंट'चा नाद एका हसत्याखेळत्या संसाराचा कर्दनकाळ ठरला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे एका विवाहित प्रियकराने आपल्या विवाहित प्रियसीच्या डोक्यात गावठी कट्ट्याने गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आयुष्य संपवले. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना शनिवारी (दि.२८ फेब्रुवारी) घडली असून, या ' क्राईममुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.

छातीवर गोंदलं होतं प्रेम...

मृत देवानंद सुभाष धनगर (वय २६) याच्या छातीवर आपली प्रियसी अनिता जगदीश पाटील (वय ३०) हिचा फोटो गोंदलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांची ओळख ४-५ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. दोघेही विवाहित होते, मात्र या प्रेमसंबंधांमुळे देवानंदची पत्नी त्याला आधीच सोडून गेली होती. अलीकडच्या काळात अनिताने देवानंदला प्रतिसाद देणे बंद केले होते, याचाच राग मनात धरून देवानंदने हे टोकाचे पाऊल उचलले.

चिमुकल्या मुलीने उघडला मृत्यूचा दरवाजा

अनिताचे पती जगदीश पाटील हे सकाळी आईला भेटण्यासाठी निमगव्हाण येथे गेले होते. मुले शाळेत गेली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास अनिताची मुलगी शाळा सुटल्यावर घरी आली तेव्हा घर आतून बंद होते. तिने लोखंडी दरवाजाच्या जाळीतून हात टाकून कडी उघडली आणि आत पाऊल ठेवताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई पाहून चिमुकलीने हंबरडा फोडला आणि तत्काळ वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली.

गावठी कट्ट्यातून झाडल्या गोळ्या

देवानंद धनगर हा (MH 18 AM 0850) क्रमांकाच्या मोटरसायकलने अकुलखेड्यात अनिताच्या घरी पोहोचला होता. अनिताने काही वेळापूर्वीच शेजारील महिलांच्या मदतीने दोन काठावर गोधड्या तयार केल्या होत्या. घरात कुणीही नसल्याची संधी साधून देवानंदने सोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून अनिताच्या डोक्यात गोळी डागली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता स्वतःवरही गोळी झाडून घेतली. पती जगदीश पाटील घरी परतले तेव्हा दोघांचेही मृतदेह पडलेले होते, मात्र त्यांनी देवानंदला यापूर्वी कधीही पाहिले नसल्याने त्यांची ओळख पटू शकली नव्हती.

पोलीस दलाची धाव

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोटारसायकल आणि शस्त्र जप्त केले असून, फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news