खडसे-महाजन राजकीय वाद पेटला; 'ये रिश्ता क्या कहलाता है?' म्हणत महाजनांनी फोटो शेअर करत, खडसेंवर साधला निशाणा

Khadse vs Mahajan: उत्तर महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर
Khadse vs Mahajan
Khadse vs MahajanPudhari Photo
Published on
Updated on

Maharashtra political news

जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचा एका वादग्रस्त व्यक्तीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत, "काय ही तुझी व्यथा..." आणि "ये रिश्ता क्या कहलाता है?" अशा बोचऱ्या शब्दांत थेट हल्ला चढवला आहे. या फोटोमुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली असून, दोन्ही नेत्यांमधील वाद नव्या वळणावर पोहोचला आहे.

'गुलाबी गप्पां'वरून महाजनांनी खडसेंना डिवचले

गिरीश महाजन यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रफुल्ल लोढा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत लोढा हे खडसेंना गुलाबाचे फूल देताना दिसत आहेत. हाच धागा पकडत महाजन यांनी खडसेंवर प्रश्नांची सरबत्ती केली.

महाजन आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "एकनाथ खडसे... तुमच्या या 'गुलाबी गप्पा' कोणासोबत रंगल्या आहेत? हा तोच प्रफुल्ल लोढा आहे ना, ज्याला तुम्ही 'दारूडा' म्हणाला होतात आणि ज्याने तुमच्यावर तुमच्या मुलाच्या खुनाचा आरोप केला होता? आता त्याच व्यक्तीचा आधार घेऊन तुम्ही माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहात?"

खोट्या आरोपांवरून महाजनांचे प्रत्युत्तर

महाजन यांनी केवळ फोटो पोस्ट करून खडसेंना डिवचले नाही, तर २०१९ ते २०२२ या काळात आपल्यावर झालेल्या आरोपांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य खोटे आरोप केले. माझी आर्थिक गुन्हे शाखेसह अनेक यंत्रणांकडून चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे."

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एकेकाळी सहकारी आणि आता कट्टर राजकीय विरोधक असलेल्या या दोन नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. मात्र, महाजन यांनी थेट प्रफुल्ल लोढा यांच्यासोबतचा खडसेंचा फोटो समोर आणल्याने या वादाला नवी फोडणी मिळाली आहे. ज्या व्यक्तीने खडसेंवर गंभीर आरोप केले होते, त्याच व्यक्तीसोबतच्या त्यांच्या संबंधांवरून महाजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. यावर एकनाथ खडसे काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

'या' लोकांचे लोढासोबत काय संबंध?  फोटो शेअर करत, गिरीश महाजन यांचा सवाल

हनीट्रॅप प्रकरणानंतर काहीही संबंध नसताना केवळ एका फोटोच्या जोरावर प्रफुल्ल लोढासोबत माझे नाव जोडण्यात काही रिकामटेकडे लोक पुढे आहेत, असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचे प्रफुल्ल लोढासोबतचे फोटोच समोर आणले आहेत. 'मोठे साहेब' शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल लोढा गहन चर्चा करताना, संजय राऊत यांच्या उपस्थितीत, उद्धव ठाकरे यांच्या अगदी शेजारी मास्क लावून उभा असलेला प्रफुल्ल लोढा, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा लोढाचा फोटो आणि तत्कालीन कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत प्रफुल्ल लोढाची जवळीक दाखवणारा फोटो असे कॅप्शन देत महाजन यांनी हे फोटो एक्सवरून शेअर केले आहेत. "आता या लोकांचे लोढासोबत काय संबंध आहेत?" असा थेट सवाल करत खडसेंनी महाजनांच्या हल्ल्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news