आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी फोडा – गुलाबराव पाटील

जळगाव : मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ
जळगाव
जिल्हा नियोजन भवन येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या संकल्पने अंतर्गत तालुकास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. (छाया : नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : "वातावरण सुंदर करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत आहेत. पण शाळा वाचवण्यासाठी शिक्षकांनीही मेहनत घेणे गरजेचे आहे. आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो, तसेच तुम्ही इंग्रजी माध्यमातील मुले फोडा आणि मराठी शाळांचे भविष्य उज्ज्वल करा," असे परखड मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री "माझी शाळा, सुंदर शाळा" या संकल्पनेअंतर्गत तालुकास्तरीय विजेत्या शाळांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार (दि.12) रोजी जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजू मामा भोळे, शिक्षण अधिकारी विकास पाटील आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी शिक्षकांना उद्देशून सांगितले की, "आज हनुमान जयंती आहे. त्यामुळे हनुमानाची गदा घेऊन बाहेर पडा आणि विद्यार्थ्यांच्या मनातील 'राम' बना, जिथे मराठी शाळांची पटसंख्या वाढेल, त्या शाळेला आमदार निधीतून दहा लाख रुपये देण्यात येतील. शाळा वाचवायची असेल तर शिक्षकांनीही पटसंख्या वाढवण्यासाठी फिरावे लागेल."

जळगाव
पारितोषिक वितरण समारंभात दीपप्रज्वलन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. (छाया : नरेंद्र पाटील)

इंग्रजी म्हणजे सर्व नाही

"इंग्रजी बोलणे म्हणजे हुशारीचे लक्षण नाही. UPSC, MPSC व इतर राजस्व परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थ्यांनीही यश मिळवले आहे. इंग्रजी म्हणजे सर्व काही नाही. प्रत्येक राज्याने आपल्या भाषेला महत्त्व दिले आहे," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ड्रेस कोडमुळे शिक्षकांचाही आदर्श

"विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनीही ड्रेस कोड स्वेच्छेने स्वीकारावा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुकरणाची भावना निर्माण होईल व शिक्षकांचाही आदर्श उभा राहील," असेही ते म्हणाले.

धरणगाव येथील शिक्षक प्रेरणादायी उदाहरण

धरणगाव तालुक्यातील शिक्षक सोनवणे यांचे उदाहरण देत पालकमंत्री म्हणाले, "ते पंधरा वर्षांपासून एका ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची बदली झाल्यास ग्रामस्थ व विद्यार्थी मला घेऊन येतात. अशा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे खरे संस्कार घडवले आहेत."

जळगाव ग्रामीणमधील शिक्षकांनी किमान दहा हजार विद्यार्थी दाखल करण्याचा संकल्प करावा. भविष्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशासाठी लोक आमच्याकडे पत्र घेण्यासाठी यावेत, अशी परिस्थिती निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असेही त्यांनी शिक्षकांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news