Jamner Crime: दोरीने बांधले, गुंगीचे औषध दिले... व्हिडिओही काढला; 30 वर्षांच्या महिलेवर सामूहिक अत्याचार!

Jamner Crime: दोरीने बांधले, गुंगीचे औषध दिले... व्हिडिओही काढला; 30 वर्षांच्या महिलेवर सामूहिक अत्याचार!
Published on
Updated on

जळगाव : जामनेर तालुक्यात 30 वर्षांच्या आदिवासी महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. पोलिसांनी एकूण सात ते आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम करीत आहेत.

पीडित महिला ही 30 वर्षांची असून आरोपींनी तिला गुंगीचे औषध अन्नपदार्थात मिसळून दिले. यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली. नराधमांनी तिच्यावर अत्याचार करत घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

महिनाभरापूर्वी आरोपींनी पीडितेला पुन्हा गाठले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला दुचाकीवरुन बसवून नेले. नराधमांनी पीडितेला दोरीने बांधले, तिला बंदुकीचा धाक दाखवला आणि तिच्यावर अमानूष अत्याचार केले. याचाही नराधमांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला.

अखेर उपचारानंतर 16 जुलै रोजी पीडितेने फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.

रामेश्वर गणपत राठोड, सुरज भिमसिंग राठोड, पवन छगन राठोड (रा. सुकानाईक तांडा) आणि भारमल कृपाल साबळे (रा. गोदरी तांडा) अशी या आरोपींची नावे असून आरोपींमध्ये आणखी तीन ते चार जण आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news