Jalgaon youth killed | उसनवारीच्या पैशांवरून तरुणाचा निर्घृण खून, मृतदेह महामार्गावर फेकला!

Jalgaon | साक्री फाटा येथील धक्कादायक घटना: संशयित संजय आवटेसह साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू
death
death
Published on: 
Updated on: 

जळगाव:उसनवारीचे पैसे परत न केल्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिला. ही घटना घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. भूषण उल्हास व्हावले (वय २१, रा. डी. एल. हिंदी हायस्कूलच्या मागे, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आरोपी संजय आवटे व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मृतत भूषण व्हावले याने संशयित आरोपी संजय आवटे (रा. भुसावळ) याच्याकडून काही रक्कम उसनवारीने घेतली होती. ही रक्कम परत न केल्याचा राग मनात धरून, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास संजय आवटे व त्याच्या इतर साथीदारांनी भूषणला साक्री फाटा परिसरातील एका फार्महाऊसवर बोलावून घेतले.

फार्महाऊसवर बेदम मारहाण करून संपवले

फार्महाऊसवर पैसे देण्यावरून वाद पेटला. संशयित आरोपींनी भूषणला कोणत्यातरी धारदार अथवा प्राणघातक हत्याराने बेदम मारहाण केली. त्यानंतर भूषण यास रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अलिशान वॉटर पार्कसमोरील पुलाजवळ रस्त्यावर फेकून दिला आणि आरोपी तिथून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच जळगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

याप्रकरणी मयताचा भाऊ विशाल उल्हास व्हावले (वय २५) याच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांनी संशयित आरोपी संजय आवटे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news