जळगाव : प्रत्येक घरापर्यंत नळ कनेक्शन द्वारे पाणी 'हर घर जल' हे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिले होते व ते अमृत योजनेमार्फत संपूर्ण देशात राबवले जात आहे. याच योजनेतून जळगाव शहरासाठी 2017 मध्ये सुरू झालेली अमृत योजना आज मंगळवार (दि.15) रोजी महानगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी खासदार स्मिता वाघ आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, माजी महापौर स्मिता भोळे जैन इरिगेशनचे प्रकल्प अभियंता भिरूड ,अन्य सहकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जळगाव शहरासाठी सुरू करण्यात आलेली अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 253 कोटी चे कामाचे हस्तांतरण महानगरपालिकेकडे करण्यात आले. यामध्ये सहा उंच पाण्याच्या टाक्यात दोन पंप हाऊस 910 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन व 85000 घरांना नळ कनेक्शन योजना हस्तांतरित करण्यात आले.
यावेळी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून योजनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वाघ यांनी सांगितले की, 2017 साली 'हर घर जल' ही योजना सुरु झाली होती. मात्र काही अडचणीमुळे ही योजना आता पूर्ण झालेली आहे. 700 किलोमीटरवरून 900 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. पंतप्रधानांनी जे स्वप्न पाहिले होते ते प्रत्येक घरामध्ये नळ कलेक्शन द्वारे पाणी ते या योजनेमार्फत देशात व जिल्ह्यात पूर्णत्वास येत आहे. महिलांच्या डोक्यावरील भार हलका करण्यात येऊन हंडा उतरवण्याचे काम घराघरापर्यंत आले आहे. महिलांचे दुःख दूर करण्यात यश आल्याचे व एक महिला म्हणून मला या गोष्टीचा आनंद वाटत असल्याचे वक्तव्य खासदार स्मिता वाघ यांनी यावेळी व्यक्त केले.