जळगाव : अमळनेरची परंपरा यंदाच्या विधानसभेत कायम राहील का?

अमळनेरचे मतदार कोणाला संधी देतील? आगामी निवडणुकीत अनिश्चितता
महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्र विधानसभा
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभेमधून अमळनेर हे असे एकमेव विधानसभा क्षेत्र आहे की जेथे भाजपाच्या बालेकिल्ल्यावर अपक्ष आमदारांनी विजय मिळवला. त्यानंतर या विधानसभा क्षेत्रातून सलग कोणताही उमेदवार निवडून आलेला नाही.

अमळनेर येथील नागरिक दर पाच वर्षासाठी नवीन आमदारांना संधी देत आहे. भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करून विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील हे निवडून आले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पडल्यानंतर अमळनेर विधानसभा क्षेत्रातील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अजित पवारांना साथ देत मंत्री पदाला गवसणी घातली. त्यामुळे आता अमळनेरची परंपरा खंडित करुन पुन्हा विजयाची माळ घालणार की पराभव पाहणार हे येत्या विधानसभा निवडणुकीमधून स्पष्ट होणार आहे. अमळनेर येथील जनता दरवेळी नवीन आमदाराला विकास कामासाठी संधी देत असताना यावेळी पक्षाचा किंवा अपक्षाचा विचार केला जात नाही.

पाडळसरे धरणाला चार हजार कोटीची मान्यता दिलेली असली तरी पंतप्रधान योजनेमध्ये समावेश होण्याची घोषणा बाकी आहे. ही घोषणा कधी होणार व धरणाला प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार व किती वर्षे लागणार ही आकडेमोड तूर्तास लावणे कठीण झालेले आहे. त्यामुळे या घोषणा हवेतच राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अमळनेर विधानसभा क्षेत्रावर १९९० पासून भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र हा बालेकिल्ला २००९ मध्ये अपक्ष उमेदवार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी पंचावन्न हजार मतांनी पराभव करत काबीज केला. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हात धरून पुन्हा मैदानात उतरले मात्र त्यांना यश आले नाही. यावेळी अपक्ष उमेदवार असलेले शिरीष चौधरी यांना जनतेने संधी दिली. त्यानंतर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले अनिल भाईदास पाटील यांनी भाजपाचे उमेदवारांला पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातील एकमेव आमदार अमळनेर विधानसभा क्षेत्रातून संधी मिळाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडतात त्यांनी अजित पवार यांचा हात धरून मंत्री पदाला गवसणी घातली. डॉक्टर व्ही. एस. पाटील यांच्यानंतर सलग कोणताच आमदार निवडून आलेला नाही. ही परंपरा अनिल भाईदास पाटील खंडित करणार का कायम ठेवणार हे येत्या विधानसभेत पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झालेली आहे

महाआघाडी असो का युती असो आपआपल्या परीने सर्वांनी चाचण्या विधानसभेच्या घेण्यास सुरुवात केलेली आहे. लोकसभेत महायुतीला पाहिजे तसे यश आले नाही. मात्र विधानसभेसाठभ महायुतीने जोरदार तयारी सुरु केलेली आहे.

आघाडी कडून ही जागा जर राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्यास या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची संकेत मिळू लागले आहेत. असे झाल्यास ज्या अमळनेरकर यांनी शरद पवारांच्या पक्षातील उमेदवाराला संधी दिली होती ते अजित पवारांच्या पक्षातील उमेदवारास संधी देणार का महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

महायुतीकडून परंपरागत ही जागा भाजपची आहे. त्यामुळे भाजपा आपला हक्क सोडेल का !आणि अजित पवार यांच्या गटाला देईल का ! हा ही महत्वाचा प्रश्न आहे. कारण या जागेवर दोघेही माहितीतील पक्ष आपापली दावेदारी सांगणार कारण नंतर गिरीश महाजन यांना लोकसभेमध्ये जळगाव जिल्हा सोडल्यास बाकी ठिकाणी पराभव चाखावा लागलेला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा क्षेत्र जास्तीत जास्त जिल्ह्यातील जागा भाजपच्या पदरात पाडून विजयाचा झेंडा रोवण्याची त्यांचा प्रयत्न राहतील. तर दुसरीकडे जिल्ह्यात अजित पवारांच्या एकमेव असलेला आमदार व जिल्ह्यात अजून आमदार जिंकून आणण्यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण अमळनेरच्या बाहेर ते कधी गेलेले दिसून येत नाही

आघाडी मध्ये जागा वाटपावरून जास्त ओढाताण होणार नाही. मात्र महायुतीमध्ये जिल्ह्यातील 11 जागांमध्ये ओढाताण नक्की होणार आहे. एकनाथ शिंदे गटाकडे मुक्ताईनगर जळगाव, ग्रामीण एरंडोल पाचोरा चोपडा तर भाजपा जामनेर भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव आणि काँग्रेस रावेर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - अमळनेर आहे.

भाजपा आपली हक्काची जागा तर सोडणार नाही मात्र यापेक्षा जास्त पदरात पाडून घ्यायचे प्रयत्न राहतील एकनाथ शिंदे शिवसेना गट विद्यमान आमदार असलेल्या जागा आपला दावा तर सांगणार आहे परंतु आगामी निवडणुकीत इतर ठिकाणीही तो दावा होऊ शकतो.

आजपर्यंत असलेली कारकीर्द अशी

१९९० गुलाबराव वामनराव पाटील भाजप ,१९९५, १९९९ व २०२४, डॉ. व्ही. एस, पाटील भाजप, २००९ कृषी भूषण साहेबराव पाटील अपक्ष, २०१४ शिरीष चौधरी अपक्ष, २०१९ अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news