

जळगाव | सध्याला अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामध्ये वाहतुकीचे नियम तोडण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. वाहतूक कर्मचारी हटला की वाहन धारकांचे नियम लागू होतानाचे चित्र सध्या जळगाव मध्ये दिसत आहे. एकीकडे शहर वाहतूक शाखा व महामार्ग पोलीस वाहतुकीचे नियम आठवण करून देण्यासाठी सप्ताह व विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. दुसरीकडे वाहनधारक त्याची पायमल्ली करताना दिसून येत आहे.
रस्त्यावरील अपघात कमी व्हावे व नागरिकांचा जीव वाचावा यासाठी महामार्ग पोलीस शहर वाहतूक शाखा व पोलीस विभाग विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाहतूक नियमांचे धडे गिरवण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे या धड्यांना तिलांजली देताना वाहन चालक दिसून येत आहे. चित्रा चौकापासून तर कोट चौक तर कोट पासून ते स्वातंत्र्य चौक या परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला खाजगी वाहने म्हणजे नगरपालिकेने किंवा पोलिसांनी उपलब्ध करून दिलेली पार्किंग व्यवस्थाच आहे.
चित्र चौकापासून सुरुवात जर झाली तर गणपती मंदिर व त्या बाजूला असलेले खाद्यपदार्थांची दुकाने मिसळची दुकाने गोलाणी मार्केट मध्ये जाण्याच्या रस्ते, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मैदान या ठिकाणी वाहन पार्किंग साठी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे तीस फुटाचा रस्ता दहा फुटावर येऊन जातो. बेंडाळे महाविद्यालय परिसरा जवळ व क्रीडा संकुलनाजवळ एसबीआय बँक तरच याच परिसरात असलेले दवाखान्याच्या बाहेर बँकेच्या बाहेर बस स्थानक परिसर व लॉजिंग च्या बाजूला वाहन अशी रस्त्यावर उभी असतात की दुभाजक असलेला रस्ताही एका बाजूने कमी झालेल्या दिसून येतो.
एसटी स्टँड परिसरामध्ये तर बाहेर निघणाऱ्या व आत येणाऱ्या या दोन्ही रस्त्यांवर रिक्षा चालकांची दादागिरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे वाहतूक कर्मचारी दंड करत असतात तर दुसऱ्या ठिकाणी रिक्षा चालक आपल्या मनाला येईल तेथे रिक्षा स्टॅन्ड बनवून गाड्या उभ्या करीत आहे.
चित्र चौकापासून गणपती मंदिर तेथून अग्निशामक दलाच्या जाण्याचा रस्ता गोलाणी मार्केट या परिसरात तर गाडी चालवणे म्हणजे लर्निंग लायसन्स वरून पक्के लायसन तयार करण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षाच पास करावी लागते असे वाहन चालावे लागते. त्यामुळे या परिसरात कडक कारवाई कधी होणार या बेशिस्त वाहनांना कधी शिस्त लागणार व यावर कधी कारवाई होणार की ज्यामुळे रस्त्यांनाही मोकळा श्वास घेता येईल असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
महानगरपालिकेने अतिक्रमण विभाग फक्त नावालाच ठेवलेला दिसून येत आहे तर दुसरीकडे हा विभाग फक्त भाजी मार्केट व इतर परिसरांमध्येच काम करताना दिसून येतो बाकी ठिकाणी अतिक्रमण झालेले यांना दिसून का येत नाही हा मोठा प्रश्न आहे.
शहरातील वाहतुकीचे अडथळे व मनमानी कारभारांबाबत अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्यात आलेली असून शहरात अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड वाहतूक शाखा जळगाव