जळगावचा पारा 38 वर ; अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले...!

Jalgaon Weather news | पुढील दोन दिवस 'धोक्याचे'; गारपिटीसह जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
Jalgaon Weather Update
Jalgaon Weather Update
Published on
Updated on

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चडाओढीनंतर जळगावच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. शहरात २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ममुराबाद परिसरात तर पावसाने अक्षरशः बॅटिंग केली आहे. विशेष म्हणजे, पुढील ४८ तास जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, वादळी वाऱ्यासह गारपिटीची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावकरांना निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव येत आहे. १ एप्रिल रोजी कमाल तापमान ३५.६°कमाल होते, ते २ एप्रिल रोजी थेट ३८.१°कमाल वर पोहोचले. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसामुळे किमान तापमानात मोठी घट होऊन ते १९.८°किमान पर्यंत खाली आले आहे. आर्द्रतेचे प्रमाण ८४ टक्क्यांवर गेल्याने वातावरणात गारवा असला तरी पिकांच्या नुकसानीची धास्ती वाढली आहे.

Jalgaon Weather Update
Unseasonal Rains : सलग दुसऱ्या दिवशीही शहरासह परिसरला अवकाळी पावसाने झोडपले

ममुराबादमध्ये पावसाचा जोर

जळगाव शहरातील हवामान केंद्रात २३ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी ममुराबाद एस.आर.एफ. केंद्राच्या परिसरात सर्वाधिक २८.८ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दोन 'रॅनी डेज' (पावसाचे दिवस) नोंदवण्यात आले आहेत.

Jalgaon Weather Update
Unseasonal rain : विजेच्या कडकडाटासह शहरात अवकाळी पाऊस बरसला

सावधान! ३ आणि ४ एप्रिलला गारपिटीचे सावट

हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. केवळ पाऊसच नाही, तर काही भागांत गारपीट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेला माल सुरक्षित स्थळी हलवावा आणि नागरिकांनी विजांच्या कडकडाटात घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news