

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी रविवारी (दि.30) 18 ठिकाणी मतदान झाले. यात एकूण 5 लाख 77 हजार 910 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्याची एकूण मतदान टक्केवारी 65.56 इतकी नोंदवली गेली.
पुरुषांमध्ये 66.68 टक्के तर महिलांमध्ये 64.21 टक्के मतदानाची नोंद झाली. पुरुषांचे मतदान महिलांपेक्षा 2.47 टक्क्यांनी जास्त राहिले.
जळगाव जिल्ह्यातील मतदान असे...
एरंडोल – 75.49 टक्के
रावेर – 74.74 टक्के
यावल – 73.16 टक्के
फैजपूर – 72.91 टक्के
वरणगाव – 72.71 टक्के
धरणगाव – 72.54 टक्के
पारोळा – 72.87 टक्के
भुसावळ – 54.51 टक्के
जामनेर – 60.68 टक्के
अमळनेर – 64.48 टक्के
चाळीसगाव – 62.58 टक्के
पाचोरा – 68.82 टक्के
सावदा – 69.99 टक्के
चोपडा – 67.97 टक्के
भडगाव – 68.70 टक्के
नशिराबाद – 68.11 टक्के
मुक्ताईनगर – 64.44 टक्के
शेंदुर्णी – 69.89 टक्के
मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव या नगरपरिषद व नगरपंचायती या वेळच्या निवडणुकीत विशेष चर्चेत राहिल्या. यापैकी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात मुक्ताईनगर व सावदा, भुसावळ विधानसभा क्षेत्रात भुसावळ, तर जामनेर विधानसभा क्षेत्रात जामनेर आणि शेंदुर्णीचा समावेश होतो. पाचोरा विधानसभा क्षेत्रात पाचोरा व भडगाव, तर चाळीसगाव विधानसभा क्षेत्रात चाळीसगाव नगरपरिषद येते. जिल्ह्यातील एकूण मतदान सरासरी 65.56 टक्क्यांवर स्थिरावले आहे. आता 21 डिसेंबर रोजी या मतदानाचा निकाल लागणार आहे.