Jalgaon MLC Election | चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदान प्रक्रियेवर बहिष्कार

शहर विकास आघाडीच्या १३ नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने संबंधित मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदानाची नोंद
Chalisgaon Municipal Council Corporators
Chalisgaon Municipal Council CorporatorsPudhari
Published on
Updated on

Chalisgaon Municipal Council Corporators

जळगाव : जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच विविध राजकीय घडामोडींना वेग आला होता. मतदानाच्या दिवशीही चाळीसगाव नगरपरिषदेतील शहर विकास आघाडीच्या १३ नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने संबंधित मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदानाची नोंद होऊ शकली नाही.

चाळीसगाव नगरपरिषद ही स्थानिक राजकारणातील महत्त्वाचे केंद्र मानली जाते. नगराध्यक्षपदही संबंधित राजकीय गटाकडे असल्याने या मतदानाकडे विशेष लक्ष लागले होते. मात्र शहर विकास आघाडीचे नगरसेवक अभिषेक देशमुख, सायली जाधव, घृष्णेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, दीपक पाटील, इमरान शेख, विजया पवार, राजश्री राजपूत, स्वाती राखुंडे, सविता ठाकूर, वैशाली मोरे, राहुल मस्के आणि पुनम अहिरे यांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Chalisgaon Municipal Council Corporators
Jalgaon MLC Election | जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी ६३० मतदार बजावणार मतदानाचा हक्क

या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना नगरसेवक दीपक पाटील यांनी सांगितले की, ज्या उमेदवाराला आघाडीने पाठिंबा जाहीर केला होता, त्या उमेदवाराने ऐनवेळी आपली भूमिका बदलून भाजप उमेदवाराला समर्थन दिले. तसेच निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप उमेदवारांनी मतदार म्हणून आमच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला नाही, त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या बहिष्काराचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असून, चाळीसगाव मतदान केंद्रावर अपेक्षित शंभर टक्के मतदान होऊ शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news