जळगाव : वरणगावचे केंद्र रद्द केलेले नाही; पोलीस प्रशिक्षण केंद्र पळविल्याचे केले खंडन

राज्य राखीव दलाचे वरणगावला नवीन केंद्र मंजूर; राष्ट्रवादीच्या युवा उपजिल्हाध्यक्षांकडून केलं खंडन
Police Training Centre
पोलीस प्रशिक्षण केंद्रfile photo
Published on
Updated on

जळगाव : राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्रावरुन दोन पक्षांमध्ये वाद सुरू असताना यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून वरणगाव येथील केंद्र पळविण्यात आलेले नाही. तर जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे नव्याने प्रशिक्षण केंद्र मंजूर झालेले असून त्याचा पाठपुरावा आमदार रोहित पवार करत आहेत. त्यामुळे केंद्र पळवापळवीचे राजकारण झालेले नसल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खंडन करण्यात आलेले असून त्याबाबत पुरावे देण्यात आलेले आहेत.

Summary

जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र होणार आहे. त्याकरीता 152 कोटीच्या खर्चाला गृह विभागाने दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी मान्यता दिलेली आहे. त्यासोबतच 1380 पदे निर्माण होणार आहेत. युती सरकार काळात जिल्ह्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले होते. त्याचे भूमिपूजन होवून तो प्रस्ताव मात्र थांबला होता. तर 2020 मध्ये अध्यादेशाद्वारे हे केंद्र नगर जिल्ह्यातील जामखेड येथे करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार गुरुवारी (दि.1 ऑगस्ट) जामखेडबाबतचा प्रस्ताव रद्द करत गृहविभागाने हे केंद्र वरणगाव येथे करण्याचा आदेश काढलेला आहे. या केंद्रासाठी समादेशकासह विविध 1380 पदांना मान्यता देऊन साधनसामुग्री व कार्यालयीन खर्चासह 152 कोटी 26 लाख 23 हजार 404 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे निर्माण झालेल्या राज्य राखीव गट 19 चे केंद्र हे नव्याने मंजूर झाले असून त्यास तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्यता दिलेली आहे. वरणगाव येथे पोलीस दलाचे केंद्र मंजूर होते. त्यामुळे राज्य राखीव दलाचे केंद्र पळविण्याचा प्रश्नच येत नाही. तर 1999 ला राज्य राखीव दलाचे कोणतेही केंद्र मंजूर झालेले नव्हते.

याचा पुरावा म्हणून आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. 8 जुलै 2024 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील केंद्र कर्मचारी प्रशिक्षणार्थींसाठी निवासस्थाने ही बांधकाम करुन पूर्ण क्षमतेने करणे व त्यासाठीच्या कामास निधी उपलब्ध करण्याबाबत निवेदन दिलेले आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाने दि. 7 डिसेंबर 2023 रोजीच्या पत्रानुसार वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या नवीन गट निर्माण करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे दि. 1 ऑगस्ट 2024 पत्रात म्हटलेले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील युवा उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी प्रतिनिधींशी संपर्क साधून सांगितले की, 1999 ला असा कोणताही राज्य राखीव बलात जीआर निघालेला नव्हता. वरणगाव येथे पोलीस केंद्र निर्माण झाले होते व ते जामखेडला राज्य राखीव दलाचे केंद्र निर्माण झालेले आहेत त्यास तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्यता दिलेली आहे. असे आमदार रोहित पवारांनी सांगितले आहे.

1999 मध्ये झाले होते भूमिपूजन

तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते 1999 मध्ये वरणगाव येथे भूमिपूजन झालेले वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र तब्बल 17 वर्षानंतर शासनाने रद्द केले होते. त्यासाठी 106 एकर जागादेखील देण्यात आली होती. या कामासाठी 10 लाखांचा निधीदेखील खर्च देखील झाला होता. मात्र हे काम टेंडरप्रक्रियेत असताना शासनाकडून अचानक पोलीस प्रशिक्षण केंद्राचे काम रद्द करण्यात आलेले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news