जळगाव: मोटरसायकल चोरी प्रकरणी सात मोटरसायकलसह दोन आरोपी ताब्यात

नशिराबाद येथील मोटरसायकल चोरी प्रकरणात सात मोटरसायकल जप्त
जळगाव: मोटरसायकल चोरी प्रकरणी सात मोटरसायकलसह दोन आरोपी ताब्यात

जळगाव : नशिराबाद येथील खालच्या आळी येथून मोटरसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणात एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सात मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तर नशिराबाद येथील प्रणव पाटील यांची करड्या रंगाची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल ६ जून रोजी हॉटेल अमृत समोरील सर्विस रोड वरून चोरीला गेली होती.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांनी पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्सटेबल युनुस शेख, शिवदास चौधरी, राजेंद्र ठाकरे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रविण लोहार, अजीत तडवी यांच्या पथकास गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी शाहवाज शेख, अब्दुल रहेमान (वय-24), नशिराबाद यांस ताब्यात घेवुन चौकशी करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास 1 जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे. आरोपीने नशिराबाद पोलीस स्टेशनसह रामानंद नगर पोलीस स्टेशन व शनिपेठ पोलीस स्टेशन असे जळगाव जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून तीन चोरलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच जळगाव जिल्हातील चोरीच्या गुन्ह्यातील सात मोटारसायकल सुद्धा जप्त करण्यात आल्या. राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news