जळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी अल्पवयीन मुलगा ठार

Leopard attack: आईच्या हातातून मुलाला बिबट्याने ओढले
Jalgaon leopard attack
घटनास्थळी पाहणी करताना वनअधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव साखळी परिसरामध्ये शेतात काम करीत असलेल्या आई जवळील सात वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून मुलाला ठार केले. रस्त्याच्या बाजूला व जंगलाच्या लागून असलेल्या शेतात बिबट्याने हा हल्ला केलेला आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोचलेले आहेत. तर दुसरीकडे चाळीसगाव या ठिकाणी शिकार झाल्यावर चौकशी समिती लावण्यात आलेली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील वनक्षेत्रात बिबट्यांचा किंवा वाघांचा दहशत वाढलेली आहे.

यावल तालुक्यातील किनगाव जवळील साखळी परिसरामध्ये आदिवासी महिला आपल्या मुलाबरोबर शेतामध्ये काम करीत असताना बिबट्याने केलेले हल्ल्यात तिच्या डोळ्यासमोर सात वर्षाच्या बालकाला बिबट्या घेऊन पसार झाला होता. आजूबाजूच्या लोकांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.

जळगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील यावल येथील पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या कार्यक्षेत्रात किनगाव साकळी परिसरात मानकी शिवारात गुरुवार (दि. ६) रोजी दुपारी २ ते ३:३० वाजेच्या सुमारास केशा प्रेमा बारेला (वय ७) हा आदिवासी मुलगा त्याच्या आईचा हात धरून जात असताना बिबट्याने हल्ला करून आईच्या हातातून प्रेमा बारेला यास फरपटत ओढत नेऊन जखमी केल्याने सात वर्षाचा आदिवासी बालक जागीच ठार झाला. ही घटना घडल्याने साखळी किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

यावल पूर्व व पश्चिम वन विभागाच्या भोंगळ कारभाराकडे आणि आदिवासी बांधवांसह जनतेमध्ये वन विभागाच्या कामकाजाचे, मार्गदर्शनाबाबत आणि जनजागृती बाबत दुर्लक्ष होत असल्याबाबत जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक ( यावल प्रादेशिक ) जमीर शेख यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण सातपुडा डोंगरासह चोपडा,यावल,रावेर तालुक्यातून होत आहे.

याबाबत यावल क्षेत्राचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिलेला आहे. या घटनेत सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालेला असल्याचे त्यांनी सांगितले.

घटनास्थळी उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव जमीर शेख , सहा. वनसंरक्षक चोपडा, यावल . प्रथमेश हडपे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थ व शेतकरी यांचेशी चर्चा करून घ्यावायची काळजी बाबत मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news