जळगाव | कर्जबारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
 jalgaon news
कर्जबारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन File Photo
Published on
Updated on

जळगाव | धरणगाव तालुक्यातील चमगा येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी दि. २७ रोजी दुपारी शेतात विषारी औषध घेतले होते. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता दि. ३० रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे राजेश्वर आनंदा सावंत वय-४५, वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही वर्षापासून त्यांनी शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. पण सततची नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून त्यांनी दि. २७ रोजी दुपारी २ वाजता शेतात असताना विषारी औषध घेतले. त्यांचे प्रकृती खालावल्याने त्यांना नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि. ३० रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, कमलाबाई पत्नी आशाबाई आणि सागर, विशाल ही दोन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news