जळगाव : तीन दिवसपूर्वी दोन हफ्ते बहिणीच्या खात्यात जमा, बहिणींनीकडून आनंद व्यक्त

मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेबद्दल बहिणींनीकडून आनंद व्यक्त
Ladki Bahin Yojana
'लाडकी बहीण' योजनाfile photo
Published on
Updated on

जळगाव : मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण 3 हजार रुपये रक्षाबंधनाच्या तीन दिवस आधी जळगाव जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यावर यायला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी सागर पार्कवर झालेल्या महिलांच्या मेळाव्यात राखी पौर्णिमेची ओवाळणी लवकरच मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे रक्षाबंधनाआधीच पैसे आल्यामुळे बहिणी आनंद व्यक्त करत आहेत.

जळगाव मधील ज्या लाभार्थी महिलांना 3 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. त्यापैकी काही बहिणींना प्रतिनिधीक विचारले असता त्यांच्याकडून मिळालेला सकारातमक प्रतिसाद -

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला, आमच्या मुलाच्या शिक्षणा करीता तुम्ही 3000/-रुपये दिल्या बदल मी आभारी आहे' - सुनिता दिलीप चांदेलकर

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला. रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्ही ओवाळणी म्हणून ३०००/- रुपये बहिणीला दिले, खुप आनंद वाटला. - वंदना विनोद आवारे

अपेक्षेपेक्षा खूपच लवकर पैसे खात्यात आले आहेत. पैसे आल्याचा मेसेज बघून आनंद वाटला. - मोनिका महाजन

मला तर खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहेच परंतु आम्ही ज्या लाभार्थी महिलांचे फॉर्म भरून घेतले. त्या महिला पैसे जमा झाल्याचे फोन करून आनंद व्यक्त करत आहेत. - सुनिता धनगर

जळगाव जिल्ह्यात या योजनेसाठी 5 लाख 33 हजार 791 एवढे अर्ज आले आहेत. तालुकानिहाय अर्ज पुढील प्रमाणे आणि कंसात पात्र झालेल्या लाभार्थी बहिणींची टक्केवारी अशी..

जळगाव -79,350 ( 97.11 ) , जामनेर 52,071 ( 98.72 ), चाळीसगाव -51,308 ( 98.41) , रावेर -46,386 ( 98.57 ), पाचोरा -40,165 ( 97.23 ), चोपडा - 38,244 ( 97.21) , भुसावळ -36,350 ( 98.01 ), अमळनेर -33,921 ( 99.29) , यावल - 33,482 ( 98.02) , पारोळा - 24,927 ( 97.59 ), मुक्ताईनगर - 23,237 ( 98.4 ) , भडगाव- 20,681 (96.71 ), एरंडोल - 20,148 ( 96.19), धरणगाव - 19,853 ( 99.14 ), बोदवड - 13,668 ( 98.71 ) आधार सिडींग जोडणीचे काम सुरु आहे. हा लाभार्थी बहिणींचा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news