जळगाव : म्हसावद येथील शिक्षक कॉलनीतील बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा २ लाख २० हजार रूपये किंमतीचे मुद्देमाल घेऊन चोरटे लंपास झाले. याप्रकरणी सोमवारी (दि.2) रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसावद येथील वैशाली मधुकर चौधरी (वय ४० रा. शिक्षक कॉलनी, म्हसावद ता. जळगाव) या महिला २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत बाहेर गेल्या होत्या. बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटे घरातील 70 हजार रुपयांची रोकड सोन्या चांदीचे दागिने असा दोन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन घेऊन पसार झाले. शुक्रवार (दि.30) रोजी सकाळी ८ वाजता चोरी झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सोमवारी (दि.2) रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत.