Jalgaon Robbery | पोलिस पाटलाचेच घर फोडले; जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

जुना असोडा रोडवरील गजानन नगरमध्ये धाडसी घरफोडी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Robbery
RobberyPudhari Photo
Published on
Updated on

Burglary in Jalgaon

जळगाव : शहरातील जुना असोडा रोड परिसरातील गजानन नगर येथे राहणाऱ्या एका पोलीस पाटलाच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १ लाख २७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे गावाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस पाटलाचेच घर चोरट्यांनी फोडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

यावल तालुक्यातील आडगाव येथील पोलीस पाटील धर्मराज रामदास बाविस्कर (वय ४०) हे सध्या जळगाव शहरातील गजानन नगर, श्रीराम चौक परिसरातील प्लॉट क्रमांक १, रूम क्रमांक ४ येथे वास्तव्यास आहेत. दि. १४ मे रोजी रात्री ८ वाजेपासून ते १५ मे रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

Robbery
Jalgaon Crime | धरणगाव हादरले : चौथीतील मुलीवर दोन वर्षे अत्याचार; नराधम शिक्षकाला अटक

चोरट्यांनी बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेतील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगलपोत (किंमत ८० हजार ५८० रुपये), ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत ३१ हजार ५०० रुपये) तसेच १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजार ८० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे तसेच सहायक पोलीस निरीक्षक साजिद माजिद मन्सुरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय विनोद खैरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news