जळगाव | ग्रामीण असो का शहर प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थानापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी ही लाल परी म्हणजे एसटी महामंडळाने उचललेली आहे. मात्र रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे बसही रस्त्यात धसून जातात. यामुळे प्रवाशांच्या जीवाला हानी होऊ शकते. यावल भुसावळ बस ही अशीच रस्त्यात रुतली, सुदैवाने प्रवासी मात्र सुखरूप राहिले.
ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून एसटी महामंडळाला ओळखले जाते. मात्र सध्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे एसटी महामंडळाच्या बसेस नादुरुस्त अवस्थेत दिसून येत आहे. असाच एक प्रकार दि. 23 सायंकाळी भुसावळ शहरातील ( सातारा पुल) दगडी पूल हा मुख्य रस्ता येण्या-जाण्यासाठी आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या एका दुकानासमोर एसटी महामंडळाचे पुढचे चाक रस्त्यात रुतले. ते इतके मधे रुतले की प्रवाशांना चढण्यासाठी असलेला दरवाजा सुद्धा त्या गड्ड्यामध्ये चालला गेला होता.
यावरून रस्त्यांच्या धोकादायक परिस्थितीमुळे प्रवाशांचे जीवावरही बेतू शकते. मात्र यावल भुसावळ या बसमधील (एम एच 14 बी ती 2704) सर्व प्रवासी सुखरूप आपल्या निश्चित स्थानाकडे गेले. मात्र दीड ते दोन तास त्याच परिस्थितीमध्ये बस त्याच ठिकाणी उभी होती.
पांडुरंग टॉकीज कडून पुढे येणारा हा रस्ता इतका रुंद आहे की बस किंवा मोठे वाहन एकच जाऊ शकते. मात्र या ठिकाणी रस्ता जास्त मोठा नसल्याने एकीकडे जेसीबी व दुसरीकडे बस येत असल्याने हा प्रकार घडला.

