

जळगाव | विद्यापीठ हे विद्येचे माहेरघर आहे मात्र या माहेरघरमध्येच ज्या प्लास्टिक पासून धोका आहे त्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते तेच प्लास्टिक त्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये टाकून त्या ठिकाणी जमिनीचे प्रदूषण करीत आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाणपोई वर कपडे टाकून त्याचा हँगर म्हणून उपयोग होत आहे. ज्या ओसाड डोंगरांवर विद्यार्थ्यांनी घाम काढून हिरवळ फुलवली त्या डोंगरांच्या दऱ्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या व कचरा टाकून त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होते मात्र याकडे विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसून येत आहे, कारण बाहेर स्वच्छता दिसत आहे.
कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्येचे माहेरघर बनलेले आहे. या विद्येच्या बाहेर घराला निर्मिती ही डोंगर दर्यांवर झालेली होती. या उजाड डोंगरदर्यांवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी आपला घाम घाळून वृक्षारोपण करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हिरवेगार केले व उजाड अशा डोंगर व दऱ्यांना हिरवेगार केले. आज उजाड असे डोंगरदरे हिरवेगार झालेले असताना विद्यापीठात रस्ते वर्ग स्वच्छ दिसत असताना या डोंगरदऱ्यांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.
पाणी पिऊन झाल्यानंतर खाली बाटल्या या दऱ्यांमध्ये टाकण्यात येत आहेत. प्लास्टिक हे कधीच वितळत नाही किंवा जमिनीत विरघळतही नाही मात्र या प्लास्टिक मुळे जमिनीची पोत खराब होते असे असतानाही या ठिकाणी कचरा प्लास्टिकच्या बाटल्या टाकण्यात येत आहेत व तेही मोठ्या प्रमाणात मात्र याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत आहे.
ज्या ठिकाणी महात्मा गांधी चे विचार घेऊन स्मारक व केंद्र निर्माण केलेले आहे त्याच ठिकाणी त्याच विद्यापीठाच्या परिसरात मात्र अशी घाणीचे साम्राज्य दऱ्यांमध्ये निर्माण होते याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष का जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याची पाणपोई मुख्य बिल्डिंगच्या समोरच निर्माण करण्यात आलेली आहे मात्र त्यामागे लावण्यात आलेले ग्रील हे कपडे टाकण्यासाठी उपयोग करण्यात येत आहे.
एकीकडे विद्यापीठांमध्ये स्वच्छतेचा पाढा द्यायचा आणि दुसरीकडे अस्वच्छतेची निर्मिती करायची अशा प्रकार सध्याला विद्यापीठात सुरू आहे.
विद्यापीठामध्ये नुकताच पदवी प्रदान समारंभ झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता निर्माण झालेली असेल राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ती सर्व स्वच्छता करून घेण्यात येईल.
जनसंपर्क अधिकारी, सुनील पाटील विद्यापीठ