

जळगाव : जिल्ह्यात लेक लाडकी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्जांची नोंदणी झाली आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण मजबूत करणे, मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि मुलींचे सक्षमीकरण हा उद्देश ठेवून राज्य सरकारने 2023 पासून ही योजना सुरू केली आहे.
जळगाव जिल्ह्यात 10 डिसेंबरपर्यंत एकूण 13,395 अर्ज नोंदवले गेले. यापैकी 9,927 लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत पहिला हप्ता म्हणून पाच हजार रुपये देण्यात आले आहेत. यापुढील सर्व हप्ते थेट आयुक्त कार्यालयातून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.
राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत मुलीला एकूण 1,01,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. सध्या 1,470 लाभार्थ्यांचे अनुदान येणे बाकी असून त्यांचा पहिला हप्ता प्रलंबित आहे. दरम्यान, 1,355 अर्जांचे दस्तऐवज तपासणी प्रक्रियेत आहेत. त्यापैकी 643 अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे ते संबंधित केंद्रांकडे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील लाभार्थी संख्या अशी..
अमळनेर रुरल 621, भडगाव 378, भुसावळ 512, बोदवड 300, चाळीसगाव 1 - 424, चाळीसगाव 2 - 620, चोपडा 1 - 376, चोपडा 2 - 366, धरणगाव 460, एरंडोल 476, जळगाव 864, जळगाव महापालिका 711, जळगाव अर्बन नॉर्थ 1091, जळगाव अर्बन साऊथ 1113, जामनेर 1 - 550, जामनेर 2 - 593, मुक्ताईनगर 538, पाचोरा 958, पारोळा 520, रावेर 1 - 535, रावेर 2 - 574, यावल 833. असे मिळून पहिल्या हप्त्याचे 13,395 लाभार्थी आहेत.