

जळगाव : जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गाचे मोठ्या प्रमाणात कामे सुरू झालेली आहे यातच पारोळा तालुक्यातील मोंढाळा येथील पाच शेतकऱ्यांची इंदौर हैदराबाद महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी जमिन भूसंपादित करण्यात आली होती. मात्र अडीच कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मिळाला नसल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव विभागाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्या खुर्चीची जप्ती करण्यात आली आहे, ही कारवाई न्यायालयाचे आदेशाने करण्यात आली आहे.
पारोळा तालुक्यातील मोंढळे प्र. व सब गव्हाण येथील आठ शेतकऱ्यांची शेतजमीन इंदौर हैदराबाद महामार्गाच्या चौपदरीकरणांमध्ये 2013 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिग्रहित केली होती. मात्र या शेतकऱ्यांच्या अधिग्रहित जमिनीचा मोबदला भूसंपादन विभागाने दिला, मात्र शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मोबदला मान्य नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी व निधी कोर्टाकडून मोबदल्याचे आदेश या आठ शेतकऱ्यांना दोन वेळा मिळाले. प्रकल्प संचालकांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही वाढीव मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्याने याच्या विरोधात सतिश विठ्ठल मोराणकर, बिंदू माधव कुलकर्णी, राजीव मोहन अग्रवाल, नरेश हुंडामल नागदेव, नबाब मेहबूब खाटीक यांच्यातर्फे कोर्टाने जप्ती वॉरंट केला होता. सोमवारी (दि.11) दुपारी कोर्टाने दिलेल्या जप्तीवारांची अंमलबजावणी करण्यासाठी ॲड. ओम त्रिवेदी यांच्यासह साक्षीदार व यांनी जप्तीची कारवाई केली.