

जळगाव : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि. २७) ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
महेशकुमार भाईदास सोनावणे यांनी शेतातील प्लॉटवर एन.ए.च्या नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात एका ४२ वर्षीय तक्रारदाराकडून नोंदीसाठी १०,१७० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ६ हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने यशस्वीपणे पार पाडली. तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या शेतातील प्लॉटवर नोंदी लावण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.