

जळगाव : येथील श्री स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी येत्या 10 ते 17 डिसेंबर या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मूर्ती प्रतिष्ठान महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. भागवत सप्ताहाचे वाचन पी. पी. शास्त्री हे करणार आहेत.
जळगाव शहरातील टीव्ही टाॅवर परिसरात नयनरम्य असे श्री स्वामीनारायण मंदिराची स्थापना करण्यात येत आहे. या ठिकाणी श्री स्वामीनारायण भगवान यांची 202 वर्षे पूर्वीची जुनी मूर्ती स्थापना करण्यात येत आहे. येत्या 10 ते 17 डिसेंबर या काळात मूर्तीची प्रतिष्ठापना महोत्सव संपन्न होणार असून यानिमित्ताने विविध आध्यात्मिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गुरुवार (दि. 5) रोजी मंदीराच्या दर्शनीय भागाचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ होणार आहे. मंगळवार (दि. 10) रोजी नगर यात्रा शोभायात्रा व पोटी यात्रा, कथा मंडप व उत्सव मंडपाचे उद्घाटन दीपस्तंभाकरीता दीपप्रज्वलन तथा स्वागत नृत्यचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बुधवार (दि. 11) रोजी महाविष्णू याग यज्ञाचा प्रारंभ करण्यात येणार असून चतुर्वेद प्रारंभ, कथा प्रारंभ व गीता जयंती पूजन होणार आहे. गुरुवार (दि. 12) रोजी मोफत मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला असून आय हॉस्पिटलचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी मंदिराची सजावट करण्यात येणार असून आकर्षक लाईट अँड साऊंड शो देखील ठेवण्यात आला आहे.
शुक्रवार (दि. 13) रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिराचे उद्घाटन श्री महाविष्णू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सद्गुरुनंद संत का भावपूजन होईज. शनिवार (दि. 14) रोजी विद्यार्थ्यांकडून हनुमान चालीसा पाठ वदवून घेतली जाणार असून विद्यार्थ्यांनी गायलेली ही हनुमान चालीसा पाठाचे वाचन ग्रीनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड साठी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे. वीरगती प्राप्त शहीद परिवारांचा सन्मान देखील यावेळी केला जाणार आहे.
रविवार (दि. 15) रोजी श्री स्वामीनारायण संस्कार मख, सोमवार (दि. 16) रोजी श्री जैमिष भगत यांचे गायन व मंदिर पुजारी यांचा सन्मान असे कार्यक्रम होतील.
जळगाव स्वामी मंदिर हे प्रतीमंदीर बनवण्यात येत असून श्री स्वामीनारायण भगवान हे भारताची परिक्रमा करीत असताना ते बऱ्हाणपुर मार्गे भुसावळ, जळगाव, अमळनेर, धुळे व मालेगाव मार्गे गुजरातला त्यांनी प्रवेश केला होता. 200 वर्षापूर्वी ते जळगावला आले असल्या कारणाने या पार्श्वभूमीवर स्वामी नारायण मंदीराची उभारणी केली जात आहे.
मंदीराला मुख्य शिखरसह अकरा शिखर असून महाराष्ट्रातील ऐतिहासिक अद्भुत मंदिराची उभारणी यामध्ये केली आहे. यात 108 स्तंभ 60 कमानी, मुख्य घुमट, भगवान विष्णूचे 24 अवतार, कलाप पद्धतीने उभे करण्यात आले आहेत. 57 गणपती मूर्ती वेगवेगळ्या भावमुद्रांमध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मंदिरात विठ्ठल रुक्मिणी, शिव, हनुमान, श्री गणेश, शारदाम देवतांचे दर्शन भाविकांना करता येणार आहे. 54 फूट उंच असलेली दगडातील श्री हनुमान यांची भव्य मूर्ती उभारण्यात आलेली आहे.