Jalgaon Sports News : राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेत जळगाव रिले संघ तृतीय

महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन तर्फे पदक व प्रमाणपत्र देऊन विजयी खेळाडूंचा गौरव
जळगाव
राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा रिले संघ तृतीय स्थान पटकावले.Pudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन व पुणे जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव येथे पुरुष व महिला राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

शनिवार (दि.22) व रविवार (दि.23) या दोन दिवसीय स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा रिले संघ तृतीय स्थानी राहिला. अर्जुन सोपानराव पाटील ,धनश्री राजीव जाधव, भारत चंद्रकांत कुंटे ,जान्हवी गजानन महाजन या चार खेळाडूंनी या संघात सहभाग नोंदवत यश मिळवले. विजयी खेळाडूंना महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन तर्फे पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन अध्यक्ष दयानंद कुमार व सचिव राजेंद्र निंबाळते, खजिनदार अभय देशमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र ओक यांनी कौतुक केले. त्यांना आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक कमलेश नगरकर यांचे विशेष प्रशिक्षण लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news