Jalgaon : भुसावळ विभागात जळगाव - भादली दरम्यान विशेष वाहतूक आणि ब्लॉक

महामार्गाचे चौपदरीकरण प्रकल्पासाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक
Jalgaon : Special transport and block between Jalgaon - Bhadli in Bhusawal section
भुसावळ विभागात जळगाव - भादली दरम्यान विशेष वाहतूक आणि ब्लॉकPudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : भुसावळ विभागात जळगाव - भादली स्थानकांदरम्यान चार पदरी रेल्वे उड्डाणपुलाच्या (ROB) 58 मीटर गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला जात आहेत. हा उड्डाणपूल तरसोद-फागणे (NH-6) महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. यासाठी भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाईन यांवर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे.

शनिवार, दि. 1 मार्च

  1. गाडी क्रमांक १२५२० अगरतला -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ०१.१५ तास रेगुलेट करण्यात येईल.

  2. गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  3. गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  4. गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  5. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

रविवार, 2 मार्च

  1. गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  2. गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  3. गाडी क्रमांक १२७४२ पटना -वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  4. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

सोमवार, 3 मार्च

  1. गाडी क्रमांक २२१२२ लखनौ - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  2. गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  3. गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  4. गाडी क्रमांक २२३११ भागलपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

  5. गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

प्रवाशांनी रेल्वे गाड्यांबाबत असलेला बदल लक्षात घेऊन प्रवासाची योजना आखण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news