Jalgaon Crime | खिचडी न दिल्याने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून; आरोपी अटकेत

जळगावातील शामनगर भागातील धक्कादायक घटना
Jalgaon Accused Arrested
Jalgaon Accused ArrestedAI
Published on
Updated on

Jalgaon Accused Arrested

जळगाव: फक्त खाण्यास खिचडी दिली नाही, या एकाच कारणावरून चिडून जाऊन एका ४६ वर्षीय नराधमाने ४० वर्षांच्या व्यक्तीच्या डोक्यात सिमेंट क्राँक्रीटचा मोठा दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना जळगाव शहरात घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शामनगर परिसर हादरून गेला आहे. रामानंद नगर पोलिसांनी आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि. ८) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

जीवन शालीक पाथरकर (वय ४०, मूळ रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. शामनगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अंकुश नंथ्थु पाटील (वय ४६, रा. समता नगर, जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Jalgaon Accused Arrested
Jalgaon Crime | पारोळा तालुक्यात १३ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधम आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जीवन पाथरकर हे शामनगर भागातील एका मोकळ्या जागेत असताना, आरोपी अंकुश पाटील याने त्यांच्याकडे खाण्यासाठी खिचडी मागितली. मात्र, जीवन यांनी त्याला खिचडी देण्यास नकार दिला. याचाच प्रचंड राग आणि वाईट वाटल्याने आरोपी अंकुश पाटील याने शेजारीच पडलेला सिमेंट क्राँक्रीटचा जड दगड उचलला आणि थेट जीवन यांच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने जीवन पाथरकर यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत जीवन यांचे भाचे तुषार राजेंद्र सुतार (वय २८, व्यवसाय- मजुरी, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव) यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अंकुश पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(२) (खुन) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Jalgaon Accused Arrested
Jalgaon Crime : जळगाव हादरले! पोलिसांनी राबवले ‘ऑपरेशन ऑल आऊट’; ६ लाखांचा अवैध माल जप्त

घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news