जळगाव : जिल्ह्याची जबाबदारी ज्या गुन्हे शाखेवर आहे त्यांच्या वाहनालाच धक्का देण्याची वेळ आली आहे. ज्या शाखेवर संपूर्ण जिल्ह्याची व गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची जबाबदारी आहे. अशा प्रतिष्ठीत विभागाचे वाहन बंद पडून दे धक्का देण्याची वेळ आल्याने चर्चेचा विषय होत आहे.
ज्या स्थानिक गुन्हे शाखेवर संपूर्ण जिल्ह्याच्या गुन्हेगारांना आळा घालायचा असतो. त्यांचेच वाहन दे धक्का झाली आहे. अधिकारी वापरत असलेले वाहन जिल्हा पोलीस प्रशासनाचे वाहनाची दुरावस्था झाल्याचे समोर येत आहे. ज्या शाखेला 24 तास जिल्ह्यातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवावे लागते, त्यांचेच वाहन दे धक्का झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जळगाव जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचा अधिकारी कोण बनणार यावरूनच दोन महिन्यापूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते यासाठी जामनेर, धरणगाव, अमळनेर आणि मुंबई अशी कनेक्शन समोर आले होते. मात्र जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) वर पाळधी सह जामनेरची मेहर झाल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खांदेपालट झाली. जुने बीट मार्शल बदलल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नवीन स्टाफ, नवीन उर्जा यामुळे त्यांनी तसा कामाचा श्री गणेशा देखील केलेला आहे. परंतु या विभागाचे वाहनावर दे धक्का ची वेळ आल्याने गुन्हेगारांवर कशी पकड ठेवली जाईल अशी चर्चा होत आहे.