Jalgaon | शिवभोजनाच्या अनुदानात ग्रामीण व शहराचा फरक

शहरातील केंद्रांना 40 रुपये, ग्रामीण भागातील केंद्रांना 25 रुपये
शिव भोजनाच्या अनुदानात ग्रामीण व शहराचा फरक
शिव भोजनाच्या अनुदानात ग्रामीण व शहराचा फरक
Published on
Updated on

जळगाव, नरेंद्र पाटील

शासनाने सुरू केलेल्या शिव भोजन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये 78 शिव भोजन केंद्र आहेत. मात्र यामध्ये सर्वाधिक 40 हे जळगाव शहरांमध्ये शिव भोजन केंद्र आहे. यानंतर जामनेर तालुक्यात सर्वाधिक 6 शिव भोजन केंद्र आहे. या शिव भोजन केंद्रांमध्ये अनुदान देताना शासनाने ग्रामीण व शहरी असे निकष लावलेले आहेत. शहरी भागाला 40 रुपये तर ग्रामीण भागाला 25 रुपये पर थाळी अनुदान देण्यात येते.

शासनाने गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे यासाठी जानेवारी 2020 मध्ये शिव भोजन केंद्र सुरू केली. या केंद्रांवर गरजू व गरीब लोकांना दहा रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्यात येईल त्यावर शासन त्या केंद्रांना अनुदान देत आहे मात्र या अनुदान देताना शासनाने ग्रामीण व शहरी असा फरक केलेला दिसून येत आहे. यामध्ये शहरातील केंद्रांना 40 रुपये ग्रामीण भागातील केंद्रांना 25 रुपये अनुदान मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये शिवभोजन 78 केंद्र आहे. यामध्ये ग्रामीण भागात 16 तर शहरी भागात 62 केंद्रे आहेत. यामध्ये सर्वाधिक हे जळगाव शहरात 40, चाळीसगाव मध्ये चार, जामनेर मध्ये सहा, पहुर तालुका जामनेर एक, बाळंत एक, पाचोरा चार, भुसावळ चार, पारोळा दोन, रावेर दोन ,अंमळनेर तीन, चोपडा चार, यावल मुक्ताईनगर धरणगाव बोदवड भडगाव एरंडोल प्रत्येकी एक असे शिव भोजन केंद्र मंजूर करण्यात आलेली आहे.

या शिव भोजन केंद्रांमध्ये मंजूर असलेल्या थाळी 50 थाळी 2, 75 थाळी चे 13 , 100 थाळीचे 32, 125 थाळीचे दोन ,150 थाळीचे 4, 175 थाळीचे 1 तर 200 थाळीचे दोन असे अशा केंद्रांना थाळ्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news