Jalgaon RTO Strike | जळगाव परिवहन विभागाचे ५० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी

राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम
Jalgaon RTO  Strike | जळगाव  परिवहन विभागाचे ५० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी
Pudhari
Published on
Updated on

Jalgaon RTO Employees Strike

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जळगाव, चाळीसगाव आणि भडगाव येथील लिपिक संवर्गातील ५० पेक्षा अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे.

सकाळपासून आरटीओ कार्यालयातील अनेक सेवा खिडक्या बंद दिसून आल्या. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अधिकारी वर्गाला अतिरिक्त जबाबदारी सांभाळत नागरिकांची कामे मार्गी लावावी लागत आहेत.

Jalgaon RTO  Strike | जळगाव  परिवहन विभागाचे ५० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी
Jalgaon Bribe | सावकारी परवाना मंजुरीसाठी ३० हजारांची लाच घेतली ; सहकार अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध 'एसीबी'ची कारवाई

आरटीओ कार्यालयात वाहन परवाना (लायसन्स) नूतनीकरण, वाहन नोंदणी, मालकी हक्क हस्तांतरण (नाव बदल), नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन तसेच इतर प्रशासकीय कामे नियमितपणे केली जातात. मात्र लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या सेवांच्या गतीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला असून, जळगाव जिल्ह्यातील कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकारी स्तरावरून पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news