Jalgaon Robbery | जळगावात चोरट्यांचा थरार : अवघ्या १० मिनिटांत साडे नऊ लाखांसह अख्खं 'एटीएम'च पळवलं; पोलन पेठेत खळबळ

पोलिसांच्या नाकावर टिच्चून 'स्मॉल फायनान्स'वर मोठा डल्ला!
Jalgaon Robbery
Jalgaon Robbery
Published on
Updated on

जळगाव : शहरातील अत्यंत गजबजलेल्या पोलन पेठ भागात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला आव्हान देत 'इक्विटास स्मॉल फायनान्स बँक'चे चक्क एटीएम मशीनच लंपास केले. अवघ्या १० मिनिटांच्या थरारात ४ अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५० हजारांचे मशीन आणि त्यातील ७ लाखांची रोकड, असा एकूण ९ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला. या धाडसी घरफोडीमुळे जळगाव शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय?

पोलन पेठेतील सत्यम प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर 'इक्विटास स्मॉल फायनान्स बँक'चे एटीएम केंद्र आहे. शुक्रवारी (दि. ३) पहाटे १.२५ ते १.३५ च्या सुमारास ४ अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी शिरकाव केला. अत्यंत सराईतपणे या टोळीने एटीएम मशीन उचकटले आणि थेट मशीनच सोबत घेऊन पोबारा केला. मशीनमध्ये १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ७ लाख रुपयांची रोकड एटीएम मशीन (२.५० लाख) + रोकड (७ लाख) = एकूण ९.५० लाख. असा मुद्देमाल घेऊन पसार झाले ही संपूर्ण कारवाई अवघ्या १० मिनिटांत उरकून चोरटे पसार झाले.

Jalgaon Robbery
Jalgaon robbery update | जळगाव जिल्ह्याला चोरट्यांचा विळखा; मुक्ताईनगर, पाचोरा अन् जळगावात लाखांचा डल्ला

घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस दलात धावपळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी सकाळी १० वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सागर शिंपी यांनीही ताफ्यासह घटनास्थळ गाठले. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक हरिश विजय गांधी (वय ३७, रा. जळगाव, मूळ रा. अकोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि सुरेश आव्हाड या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नसली तरी, चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news