Raver Crime | रावेरमध्ये गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद

छोरिया मार्केट परिसरात रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई
Raver Illegal Weapons Arrest
गावठी कट्टा बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणाला रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलेPudhari
Published on
Updated on

Raver Illegal Weapons Arrest

रावेर : शहरातील बसस्थानकाच्या मागील छोरिया मार्केट परिसरात बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणाला रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कृष्णा दत्तू पाटील (वय २०, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

गुरुवारी (दि. २०) दुपारी छोरिया मार्केट परिसरात एक तरुण कंबरेला बेकायदेशीर शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून सापळा रचला.

Raver Illegal Weapons Arrest
Jalgaon News : जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित

पोलिसांची चाहूल लागताच संबंधित तरुणाने तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला घेराव घालून पंचांसमक्ष ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला तपकिरी रंगाचा लोखंडी गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलीस शिपाई सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून कृष्णा पाटील याच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट्टा त्याने कोणाकडून मिळवला, तसेच तो कोणत्या उद्देशाने बाळगत होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Raver Illegal Weapons Arrest
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक! एकाच दिवसात ४ ट्रॅक्टरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे आणि गुन्हे शोध पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news