

Raver Borkheda Court Verdict
जळगाव : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चौघा भावंडांच्या खून प्रकरणातील आरोपीला आज भुसावळ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भुसावळ येथे सेशन न्यायालय झाल्यानंतर बारा वर्षात पहिल्यांदाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली. न्यायाधीश यादव यांनी ही शिक्षा आरोपीला सुनावली आहे याप्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी कामकाज पहिले.
या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्यातील बोरखेडा या गावात १५ ऑक्टोबर २०२० रोजी भयंकर हत्याकांड घडले होते. बोरखेडा गावात रोड नजीक असलेल्या मुस्तफा शेख यांच्या शेतात सालदार म्हणून महताब व रुमाल बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या पाच मुलांसह राहत होते, 15 तारखेला आपल्या मध्य प्रदेश येथील मूळ गावी गेले होते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला सकाळी भिलाला कुटुंबातील मोठी मुलगी सईता 14, मुलगा रावल 11, अनिल 8, सुमन 3 ह्यांचे मृतदेह सकाळी शेतमालकाला रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली, पोलिसांनी तात्काळ परिसर सील करत तपास सुरू केला, त्यांना घटना स्थळी कुऱ्हाड भेटली होती. या हत्याकांडाने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून महेंद्र सिताराम बारेला या १९ वर्षाच्या तरूणाला अटक केली होती. सदर खटला भुसावळ स्टेशन न्यायालयात सुरू होता या खटलेला विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम हे कामकाज पाहत होते या प्रकरणात 27 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर आज चार रोजी न्यायाधीश यादव यांनी आरोपी महेंद्र बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली भुसावळ स्टेशन न्यायालय झाल्याच्या बारा वर्षाचा इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणत्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे
न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार व विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले की आरोपीला फाशीची शिक्षा दिल्यानंतर उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो त्यापूर्वीच ती फाशीची शिक्षा कायम राहावी यासाठी 30 दिवसाच्या आत उच्च न्यायालयात सर्व कागदपत्र आम्ही पाठवलेली आहेत त्या ठिकाणी सुनावणी झाल्यानंतर फाशीची शिक्षेला कायम ठेवण्यात येईल