

जळगाव : भुसावळ मंडळातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध रेल्वे प्रकल्प आणि विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय, अपर विभागीय व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर विभागीय व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीणा यांच्यासह सर्व वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते.
राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित रेल्वे प्रकल्पांविषयी माहिती घेतली. यावेळी डीआरएम इति पाण्डेय यांनी चालू व पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा विकासकामांची माहिती दिली. प्रवासी सुविधा, अधोसंरचना आणि स्टेशन विकासावर विशेष भर देण्यात आला.
गाडी क्र. 01211/01212 (बडनेरा–नाशिक मेमू) या गाडीला बोदवड व वरणगाव स्थानकांवर थांब्याची मंजुरी मिळाली आहे.
गाडी क्र. 22221/22222 (मुंबई–निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस) ला भुसावळ स्थानकावर थांब्याची मंजुरी मिळाली आहे.
गाडी क्र. 12112 (अमरावती एक्सप्रेस) मध्ये अतिरिक्त बर्थ उपलब्ध – 1AC: 2, 2AC: 12, स्लीपर: 30. भुसावळ स्थानकावरून 4 स्लीपर बर्थ आणखी वाढविण्यात आले आहेत.
बिस्वा ब्रीज, दुसखेडा येथील LHS क्र. 157 जवळील झाोझुडपे हटविणे आणि रस्त्याचे डागडुजीचे काम पूर्णत्वास नेणे.
भादली व बोदवड येथील RUB मध्ये प्रकाशयोजना कार्यान्वित करणे.
सावदा रेल्वे उड्डाणपूल येथील विद्युत चोरीमुळे पुन्हा दिवे बसविण्यात आले आहेत.
पहुर स्थानकावर मालधक्का उभारण्यास मंजुरी मिळाली आहे..
जालना–जळगाव रेल्वेमार्ग, पाचोरा–जामनेर मार्गाला 30.5 मीटर रेल ओव्हर रेल (ROR) च्या माध्यमातून ओलांडला जाणार आहे तर ROR हे नवीन पहुर स्थानकापासून 1.2 किमी अंतरावर असेल.
LC क्र. 13 (मलकापूर–वडोदा) : जलजमाव व खड्डे दुरुस्तीचे कामे पूर्णत्वास आली आहेत.
LC क्र. 19 (नांदुरा यार्ड) : 5x2.5 मीटर पादचारी अंडरपास मंजूर करण्यात आलेला आहे तर लवकरच या संदर्भातील कामांना गती मिळणार आहे.
LC क्र. 20 (नांदुरा) : प्रस्तावित ROB साठी रचना NORTH व NH-PWD अकोला यांच्याकडून मंजूर करण्यात आले आहे तर MRIDCL कडून GAD मंजुरी अपेक्षित असून सबवे सुद्धा प्रस्तावित आहे.
भुसावळ–जेएनपीटी दरम्यान कंटेनर रेल्वे वाहतुकीच्या शक्यतेवर चर्चा. भुसावळ CRT ला कंटेनर वाहतुकीसाठी अधिसूचित करण्यात आले असून इच्छुक व्यापाऱ्यांनी लोडिंगसाठी इंडेंट नोंदणी करावी.
अंदाजे 1500 केळी कंटेनर सध्या रस्त्याच्या मार्गाने वाहतूक केली जात आहेत. तसेच कर्मचारी स्थानांतरण विनंती प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
भुसावळ कॉर्ड लाईनवर नवीन प्रवासी प्लॅटफॉर्म उभारणीसाठी संयुक्त स्थल सर्वेक्षण पूर्ण झाले असून प्लॅटफॉर्म उभारणीसाठीचा प्रस्ताव मुख्यालयास सादर करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
KAVACH, MTRC व LTE आधारित सुरक्षा प्रकल्प – नवीन EPC व कंट्रोल कमांड सेंटर उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
मेमू गाड्यांच्या देखभाल सुविधेसाठी – 450 x 15 मीटर निरीक्षण पीट, 110 x 15 मीटर हेवी रिपेअर शेड, कार्यालय, विश्रांतीकक्ष व व्हील लेथ यांचा समावेश असलेले प्रकल्प यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.